२४-१०-२३
प्रिय नचु
आज मी तुला खूप दिवसांनी तुझ्या खास लाडक्या नावाने हाक मारत्येय, त्याला कारण हि तसच आहे. सकाळी घरातून निघताना तुला सांगितलं होतच मी दर वेळेप्रमाणे आणि ग्राउंड वर हि 'य' वेळेला तुझी आठवण आलीच नेहेमी प्रमाणे, डोळ्यात अश्रू उभे राहू नयेत असा अयशस्वी प्रयत्न असतो माझा, पण निदान हल्ली समोरच्यांना कळणार नाही याची काळजी घेतात ते! असो.
मुख्य मुद्दा आधी सांगते - तुला माहित्येय आज मी १०८ सूर्य नमस्कार पूर्ण केले ग्राउंड वर, आणि आधी तिथेच त्या क्षणाला तुझी जोरदार आठवण आली, तुला उचकी आलीच असेल नक्कीच! गेल्या आठवड्यात आधी घरी १०८ घातले, तेव्हा तु समोरच होतास, मला ढसाढसा रडू आलेलं, ते ही तू पाहिल होतंस नं !!
आईला फोने केला आणि विचारलं कि तुझा काय अंदाज आहे ,तेंव्हा आई मला म्हणाली 'तू अचाट झालीयेस'!
नचु या सगळ्या मागे तुझी खूप मोठी प्रेरणा आहे मला. सरांचा क्लास करणं सुरु केला, तेव्हा सुरुवातीला माझा दररोजचा क्लास संपण्याची आणि तुझी घरी येण्याची वेळ एकच होती.
मी खूप दमलेली आणि घामाने निथळताना बघून तुला खूप काळजी वाटायची आणि अत्यंत काळजीच्या स्वरात तू मला म्हणायचास - 'वंदना आपण दोघंच असतो अगं इथे,
तुला काही त्रास झाला तर कस करायचं'? तुझ्या स्वरातली ती काळजी मला कळत होती,आणि तू मला demotivate करत नाहीयेस हे हि अगदी पक्का माहिती होतं,पण माझाही निश्चय ठाम होता तेव्हा, आता सुरुवात झालीये छान regular routine ची तर आता अजिबात थांबायचं नाही. यथावकाश दुपारचा क्लास सकाळी माझ्या नेहमीच्या व्यायामाच्या वेळेला सुरु झाल्यावर, जर मी दोन दिवस क्लास केला नाही, तर तूच मला विचारायला लागला होतास - काय ग क्लास का नाही करतेस?
तुझ्या अशा प्रश्नाने मला नेहमीच बळ दिलंय, सातत्य राखण्याची प्रेरणा दिलीय. इतर हि वाचन, लेखन, sport events, कुठलीही activity असू दे माझ्या सहभाग घेण्याला,तू कायमच प्रोत्साहन दिलंस, मी छोटस जरी काहीही achieve केलं, तरी तुझ्या डोळ्यांमधून माझ्या साठी असलेलं ओसंडून वाहणारं प्रेम बघताना मला धन्य धन्य वाटायचं.
मी खूप miss करते रे ते आता!!! माझ्या कृतीमागे असलेलं तुझं पाठबळ, तुझा माझ्यावर चा ठाम विश्वास, तुझं माझ्यासाठी असण, या सगळ्याची उणीव भरून निघणं शक्य
नाही, याची पूर्ण जाणीव आहे मला, आणि या उणीवेच्या जाणिवेतूनच एक निर्धार मनोमन पक्का होत चाललाय नचु - लेखन,नियमित आणि जास्त करण्याचा!
आपण या २६.५ वर्षांमध्ये जे कडू-गोड अनुभव पदरी बांधले, अनेक कठीण प्रसंग झेलले, जीवावरच दुखणं जगलो, आणि त्या बरोबरीने अनेक चांगली माणसं बघितलं, खूप चांगले अनुभव घेतले, त्या विषयी सविस्तर लिहून काढायचं हळू हळू पक्कं होतंय अंतरात! तुझी साथ आहेच, याची खात्री आहे मला.
पाडव्याला ब्लॉग लिहिणं सुरु केलं होतं, पण नंतर काही लेखन केलं ते ब्लॉग मध्ये नाही लिहिलं, आता मात्र नियमित लिहायचा निर्धार पक्का झालाय.
नेहमी प्रमाणे सत्गुरू स्वामी माधवानंदांचा आणि बुद्धी आणि वाणी च्या देवतांचा श्री गणपती आणि श्री सरस्वती माता यांचे हि आशीर्वाद असावेत यासाठी त्यांना आदर पूर्वक नमन करून आत्ता थांबते आणि पुन्हा लवकरच लिहायचा प्रयत्न करते.
तुझीच
वंदना
चेक करण्या करता लिहिते आहे.
उत्तर द्याहटवामागच्या blog ला comments करता
येत नाहीये,असं कोणी कोणी लिहिलं होतं,
आता तो प्रश्नं सुटलाय.
कमेंट मधे खरखर जे वाटेल ते लिहा.
धन्यवाद
वंदना
Khup chan tai...manapasun lihelele..mana paryant pohche.
उत्तर द्याहटवावंदना, नेहमी प्रमाणेच छान लिहिले आहेस. तुला नचिकेत चे पूर्ण प्रोत्साहन, पाठबळ होते तसेच ते कायम राहील ही खात्री आहे. प्रत्यक्ष तो दिसत नाहीये पण तो तुमच्या सोबतच आहे. तो पूर्ण लक्ष ठेवतो आहे. त्याने दिलेला प्रतिसाद तू लक्षात ठेऊन त्याला आवडणाऱ्या सर्व गोष्टी तू करत आहेस, एवढं दु:ख कोसळले आहे तरीही हिमतीने रूटीन नीट आखले आहेस. १०८ सूर्यनमस्कार घालणं किती अवघड आहे हे मी जाणते, तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे वंदना ❤️. तुझ्या सर्व ॲक्टिव्हिटीज अशाच चालू ठेव. तुला नचु एकटी कधीच ठेवणार नाही. मला खात्री आहे.
उत्तर द्याहटवाHi...
उत्तर द्याहटवाKhoop bolayachay tumchyashi pan apali vel mqnage hot nahiye....vachtana prasang dolyasamor aale...khoop liha ..an asech prem karat raha tich tumachi strenght aahe...
Excellent Vandana....your writing is very nice. Toches direct to heart.very very strong you are.We never met.but reall want to meet you.
उत्तर द्याहटवावंदना, अभिनंदन १०८ सूर्यनमस्कार घातल्याबद्दल. तू अफाट आहेसच.नचिकेतचे तुला सर्व गोष्टी मध्ये प्रोत्साहन असायचं. त्याचं हे पाठबळ तुला अधिकाधिक वरचढ होण्यासाठी कायम मदत करेलच. तू कधीच एकटी नाहीस. तो तसं तुला राहु देणार नाही. त्याचं असणं तुला अजूनही जाणवतं ना! सगळ्या परीक्षा तुम्ही उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन नचउलआ अभिमान अनुभवायला देणार, हे निश्चित! तू अशीच खंबीरपणे उभी राहिलेली तो जिथे असेल तिथून पहात आहे. त्याच्या अंतःकरणांमध्ये आनंद होत आहे.
उत्तर द्याहटवा-नीलिमा