पोस्ट्स

इमेज
  डॉ बाबांच्या स्मृती  १जुलै २०१९  डॉक्टर्स डे च्या सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा   माझे सासरे डॉ. बाबा अलूरकर यांचा आज जन्मदिवस. आज ते असते तर ९०दी गाठली असती !!  खरे डॉक्टर-पेशाने,विचारांनी!!  व्यवसायात स्वतःचं संपूर्ण समर्पण आणि 'इदं न मम' या वृत्तीचं खरं खुरं साक्षात प्रतीक म्हणजे बाबा. परखड पण तितकेच स्वछं मनाचे असलेले आमचे बाबा. त्यांच्या वागण्या-बोलण्याने सुरुवातीला वाटलेला धाक आपलेपणात नकळत कधी परावर्तीत झाला कळलच नाही. खूप आठवणी आहेत त्यांच्याशी निगडीत! कधीतरी सविस्तर लिहायच्या आहेत. लातूर सारख्या ६०च्या दशकातल्या काळातल्या मराठवाड्यात असलेल्या एका छोट्या खेडेवजा गावात एक मोठ्ठ कार्य स्वसंकल्पनेतून उभारलेल्या आणि कुठलेही मान-सन्मान न स्वीकारलेल्या प्रचंड त्यागी वृत्तीच्या या अफाट असामान्य अनामिक अतिरथीला माझा कायमचा मानाचा मुजरा   १जुलै २०२०  कल्पवृक्ष कन्येसाठी..... .  आज संपूर्ण जगात कोविडचा हाहाकार सुरु असताना डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेचं महत्वं निराळं सांगण्यची अवश्यकता नाही. सर्व प्रथम वैद्यकीय सेवेतील सर्वांना मानाचा मु...

या फुलांच्या गंधकोषी ......मसाई पठारावरची नाजुक रानफुलं आणि अंतुऱ्याची फुलं

इमेज
                                                                                                                     ।।श्री।।    यावेळच्या कोल्हापुर महालक्ष्मी आणि ज्योतिबा च्या दर्शना दरम्यान च्या प्रवासात दोन नाजुक आणि या आधी कधीही नं पाहिलेली फुलं दिठीस पडली!  इथे दिठी हा माऊलींचा शब्दं आवर्जून योजावासा वाटला, इतकी  ती फुलं नाजूक साजूक आणि गोड होती, की बघितली, दिसली, पाहिली यातलं काहीच म्हणावासं वाटलं नाही!                       रविवारी सकाळी कोल्हापूर पासून जवळ असलेल्या मसाई पठारावर रप्पस पाऊस आणि जोरदार वारा असतांना, चालतांना तिथली नाजूकशी पांढरी पांढरी एकटी दुकटी फुलं दृष्टीस पड...

वारीची वार्ता 🌱🌱

इमेज
                                                                                  ।।श्री।।                                                                                                        अधिक देखणे तरी निरंजन पाहणे।                                             योगीराज विनवणे मना आले वो माये ।।   ...

प्रिय नचिकेत,

इमेज
  प्रिय नचिकेत,  खरतर आज तुझा fb वाढदिवस आणि लगेचच नंतर खर्रा खरा वाढदिवस असायचा!! शुभेच्छा तुला दोन्ही दिवशी मिळायच्याच,शुभाशिर्वाद हे मात्र खऱ्या वाढदिवसाला मोठ्या नातेवाईक मंडळींकडून मिळायचे! जूने मित्र आठवणीने कॉल करून शुभेच्छा द्यायचेच,पूर्वी तर अनेकदा त्यांनी लांबून लांबून ग्रिटींग कार्ड्स ही पाठवलेलं,मला आजही आठवतं!! तुला एकदा स्वामींनी अमेरिकेतून अल्का कडून -तुझ्या चुलत बहिणी कडून - थेट शिकागोतुन दोह्याला  शुभेच्छापर फ़ोन केला होता आणि मी आपल त्यांना सांगितल, स्वामी आज त्याचा fb वाला बड्डे आहे, तर स्वामींची कमाल ही की त्यांनी पुन्हा आठवणीने तुझ्या खऱ्या वाढदिवशीही,एवढ्या व्यापामधून लक्षात ठेवून पुन्हा कॉल केला आणि विशेष शुभाशिर्वाद दिले - अशी गुरु माऊली लाभण हे आपल सद्भाग्य!!  वाढदिवस साजरा करण्यातल्या आपल्या दोघांच्या उत्साहाचं प्रमाण मात्र व्यस्त होतं!!!! तुला कधी फार उत्साह नसायचा, मग तो तुझा वाढदिवस असो की माझा - माझा वाढदिवस लक्षात ठेवून, सकाळी शुभेच्छा दिल्यास की तु मनोमन ‘हुश्श!’ करताना कळायच,सुरुवातीला जरासं वेगळं वाटलं तरीही नंतर नंतर याचीच सवय झाली ह...