डॉ बाबांच्या स्मृती १जुलै २०१९ डॉक्टर्स डे च्या सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा माझे सासरे डॉ. बाबा अलूरकर यांचा आज जन्मदिवस. आज ते असते तर ९०दी गाठली असती !! खरे डॉक्टर-पेशाने,विचारांनी!! व्यवसायात स्वतःचं संपूर्ण समर्पण आणि 'इदं न मम' या वृत्तीचं खरं खुरं साक्षात प्रतीक म्हणजे बाबा. परखड पण तितकेच स्वछं मनाचे असलेले आमचे बाबा. त्यांच्या वागण्या-बोलण्याने सुरुवातीला वाटलेला धाक आपलेपणात नकळत कधी परावर्तीत झाला कळलच नाही. खूप आठवणी आहेत त्यांच्याशी निगडीत! कधीतरी सविस्तर लिहायच्या आहेत. लातूर सारख्या ६०च्या दशकातल्या काळातल्या मराठवाड्यात असलेल्या एका छोट्या खेडेवजा गावात एक मोठ्ठ कार्य स्वसंकल्पनेतून उभारलेल्या आणि कुठलेही मान-सन्मान न स्वीकारलेल्या प्रचंड त्यागी वृत्तीच्या या अफाट असामान्य अनामिक अतिरथीला माझा कायमचा मानाचा मुजरा १जुलै २०२० कल्पवृक्ष कन्येसाठी..... . आज संपूर्ण जगात कोविडचा हाहाकार सुरु असताना डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेचं महत्वं निराळं सांगण्यची अवश्यकता नाही. सर्व प्रथम वैद्यकीय सेवेतील सर्वांना मानाचा मु...