प्रिय नचिकेत,

 प्रिय नचिकेत, 

खरतर आज तुझा fb वाढदिवस आणि लगेचच नंतर खर्रा खरा वाढदिवस असायचा!! शुभेच्छा तुला दोन्ही दिवशी मिळायच्याच,शुभाशिर्वाद हे मात्र खऱ्या वाढदिवसाला मोठ्या नातेवाईक मंडळींकडून मिळायचे! जूने मित्र आठवणीने कॉल करून शुभेच्छा द्यायचेच,पूर्वी तर अनेकदा त्यांनी लांबून लांबून ग्रिटींग कार्ड्स ही पाठवलेलं,मला आजही आठवतं!! तुला एकदा स्वामींनी अमेरिकेतून अल्का कडून -तुझ्या चुलत बहिणी कडून - थेट शिकागोतुन दोह्याला  शुभेच्छापर फ़ोन केला होता आणि मी आपल त्यांना सांगितल, स्वामी आज त्याचा fb वाला बड्डे आहे, तर स्वामींची कमाल ही की त्यांनी पुन्हा आठवणीने तुझ्या खऱ्या वाढदिवशीही,एवढ्या व्यापामधून लक्षात ठेवून पुन्हा कॉल केला आणि विशेष शुभाशिर्वाद दिले - अशी गुरु माऊली लाभण हे आपल सद्भाग्य!! 


वाढदिवस साजरा करण्यातल्या आपल्या दोघांच्या उत्साहाचं प्रमाण मात्र व्यस्त होतं!!!! तुला कधी फार उत्साह नसायचा, मग तो तुझा वाढदिवस असो की माझा - माझा वाढदिवस लक्षात ठेवून, सकाळी शुभेच्छा दिल्यास की तु मनोमन ‘हुश्श!’ करताना कळायच,सुरुवातीला जरासं वेगळं वाटलं तरीही नंतर नंतर याचीच सवय झाली होती, पण आपली लाडकी लेक मात्र कायम अगदी लहान असल्या पासून स्वहस्ते काहीतरी छान छान तयार करुन द्यायची, नंतर थोडी मोठी झाल्यावर तर अजूनच जोरदार असायचं सगळं!! गेली दोन वर्ष मात्र आपली पिल्लं पुण्यात आणि आपण दोह्यात असं होतं, लेकीचं उत्साहाने आपल्या वाढंदिवशी काय काय करणं आपण miss करायचो!! यंदा तिच्या वाढदिवशी आम्ही अर्थात आपण सगळे एकत्र असू 😊😊माझी तेव्हा जरा व्यस्तता आहे, पण नंतर ती भरुन काढता येईल! 

तुझ्या ५० व्या वाढदिवशी, तुला दिलेल्या शुभेच्छा यंदाही पुन्हा नव्याने इथे देते …….. 
आजचा नचिकेतचा वाढदिवस खास आहे. आयुष्याचं अर्धशतक पूर्ण करताना त्याचे लाडके आदरणीय मोदीजी पुन्हा एकदा 'सबका साथ सबका विकास और सबका विश्वास' घेवून कार्यभार आणि संपूर्ण देशाची जबाबदारी पेलायला सज्जं आहेत. आयुष्याचं इंद्रधनुष्य पेलताना, जसं कृष्णाने गोवर्धन पेलताना सर्वांना आपआपली शक्ती काठीच्या रुपात टेकु सारखी लावायला लावली तसच आम्ही आमचे शक्ती-रुपी टेकु लावून या धनुष्याची प्रत्यंचा ओढून धरण्याच्या प्रयत्नाला सद्गुरु कृपेचं आणि परमेश्वराचं पाठबळ तसचं आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद सतत मिळत राहू दे अशी माझी सतत प्रार्थना आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏 
यंदा अजून poll result लागायचे आहेत, पण सकारात्मकता जशी काल होती तशीच आजही आहेच आणि उद्याही असेल!! यावेळी खूप न लिहिता तुला कसं to the point आणि precisely सगळं आवडायचं तसं करण्याचा प्रयत्न करते!!!!! 

तुझी (खूप प्रेमाची हाक) ‘बायको’ 
वंदना

टिप्पण्या

  1. ओघवती भाषा....अशीच लिहीत रहा...

    उत्तर द्याहटवा
  2. 🙏🏻 शारीरिक पीडा असूनही माणूस काम करू शकतो, हसू शकतो हे नचिकेत कडून नेहमीच स्फूर्ती देणार असेल. सतीश जोशी

    उत्तर द्याहटवा
  3. 🙏🏻 शारीरिक पीडा असूनही माणूस काम करू शकतो, हसू शकतो हे नचिकेत कडून नेहमीच स्फूर्ती देणार आहे. सतीश जोशी

    उत्तर द्याहटवा
  4. Tai tumach likhan nivval likhan nasatach kadhi. Manatil manaparyant pohachanyacha ek dhaga ahe .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका पुण्यात्म्याच्या पवित्र स्मृतीला सादर 🙏🏽🙏🏽