प्रिय नचिकेत,
प्रिय नचिकेत, खरतर आज तुझा fb वाढदिवस आणि लगेचच नंतर खर्रा खरा वाढदिवस असायचा!! शुभेच्छा तुला दोन्ही दिवशी मिळायच्याच,शुभाशिर्वाद हे मात्र खऱ्या वाढदिवसाला मोठ्या नातेवाईक मंडळींकडून मिळायचे! जूने मित्र आठवणीने कॉल करून शुभेच्छा द्यायचेच,पूर्वी तर अनेकदा त्यांनी लांबून लांबून ग्रिटींग कार्ड्स ही पाठवलेलं,मला आजही आठवतं!! तुला एकदा स्वामींनी अमेरिकेतून अल्का कडून -तुझ्या चुलत बहिणी कडून - थेट शिकागोतुन दोह्याला शुभेच्छापर फ़ोन केला होता आणि मी आपल त्यांना सांगितल, स्वामी आज त्याचा fb वाला बड्डे आहे, तर स्वामींची कमाल ही की त्यांनी पुन्हा आठवणीने तुझ्या खऱ्या वाढदिवशीही,एवढ्या व्यापामधून लक्षात ठेवून पुन्हा कॉल केला आणि विशेष शुभाशिर्वाद दिले - अशी गुरु माऊली लाभण हे आपल सद्भाग्य!! वाढदिवस साजरा करण्यातल्या आपल्या दोघांच्या उत्साहाचं प्रमाण मात्र व्यस्त होतं!!!! तुला कधी फार उत्साह नसायचा, मग तो तुझा वाढदिवस असो की माझा - माझा वाढदिवस लक्षात ठेवून, सकाळी शुभेच्छा दिल्यास की तु मनोमन ‘हुश्श!’ करताना कळायच,सुरुवातीला जरासं वेगळं वाटलं तरीही नंतर नंतर याचीच सवय झाली ह...