गुढीपाडव्या चं 'श्री'खंड २२-०३-२३ बहुदा गुढी-पाडव्याला श्रीखंडाचा बेत असतो आमच्याकडे. नाव वाचतांनाच त्यातल्या 'श्री' ची म्हणजेच शक्तीची चुणुक दिसायला लागते आणि तोंडाला पाणी सुटतं , त्यात भरीला पुरी असली तर मग काय विचरायलाच नको! श्रीखंडासाठी लागणारा चक्का घरी करुन श्रीखंड करता आलं तर ते तर अगदी 'अमृतातेही पैजा जिंके' होतं, आणि त्यात गम्मत म्हणजे चक्का बांधायचे थोडेसे कष्टं घेतले की मग त्याच चक्क्यात चक्कं श्री-, आम्र-, अननस- असे कितीतरी अगणित *- प्रकार करता येवू शकतात. चक्का बापडा जे घालू त्याला समावून घेण्यात पटाईत असतो,बरं एकाच पदार्थातून निर्माण झालेल्या पक्वान्नांमधे उत्तम वैविध्य येतं,आणि रसना तृप्त होऊन खाणारा ढेकर देत आपल्याला मनोमन आशिर्वाद देवून मोकळा होतो. श्रीखंडा ची खासियत ही की केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तरेकडे सगळीकडेच हे प्रिय पक्वान्न आहे, आणि दक्षिणेतल्या प्रियजनांना प्रेमा...
पोस्ट्स
मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे