या फुलांच्या गंधकोषी ......मसाई पठारावरची नाजुक रानफुलं आणि अंतुऱ्याची फुलं
।।श्री।। यावेळच्या कोल्हापुर महालक्ष्मी आणि ज्योतिबा च्या दर्शना दरम्यान च्या प्रवासात दोन नाजुक आणि या आधी कधीही नं पाहिलेली फुलं दिठीस पडली! इथे दिठी हा माऊलींचा शब्दं आवर्जून योजावासा वाटला, इतकी ती फुलं नाजूक साजूक आणि गोड होती, की बघितली, दिसली, पाहिली यातलं काहीच म्हणावासं वाटलं नाही! रविवारी सकाळी कोल्हापूर पासून जवळ असलेल्या मसाई पठारावर रप्पस पाऊस आणि जोरदार वारा असतांना, चालतांना तिथली नाजूकशी पांढरी पांढरी एकटी दुकटी फुलं दृष्टीस पड...