पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनातला हिरवा चाफा

  मनातला हिरवा चाफा 🌳 लहान असतांना शाळेला जाणारी वाट ही इतक्या सुंदर गोष्टींनी भरलेली होती की शाळेत जाता-येता रस्ता कधी संपायचा कळायचंच नाही!! घरासमोरचं आईने स्वच्छं शेणसडा- रांगोळी घातलेलं अंगण, अंगणात कायम फुलं देणारी  चांदणीची दोन झुडुपं आणि पेरुचं,बोरांचं, बिट्टीचं, पांढऱ्या चाफ्याचं अशी झाडं! नंतर जरा पुढे गेलं की उन्हाळ्याचे दोन महिने सोडल्यास कायम वाहती असलेली आमची उल्हास नदी, कर्जतला जातांना नदीवरच्या पुलावरुन आणि शाळेत जातांना नदीच्या बाजुने पुढे असं मज्जेत चालणं सुरु व्हायचं. नदी सोडून पुढे गेलं की,उजवीकडे दोन छोटी छोटी मंदिरं आणि डाविकडे अडुळशाच्या झुडुपांची रांग,त्यांची फुलं तोडून देठातला मध चाखण्यातला आनंद काही औरच, जरा चार पावलं पुढे आलं की  वड आणि पिंपळाचे मोठ्ठे पार आणि दोन्ही अगदी गावाचे रक्षक असल्यासारखे मोठ्ठे वृक्ष, त्यांच्या सावलीतून पुढे आलं की विठृठल-रखुमाई आणि रामाच्या मंदिराचं आवार,ते मागे टाकलं की शाळेच्या वाटेवर असलेल्या एका घराच्या( मेढींचं घर) अंगणाच्या अगदी कोपऱ्यात एक हिरव्या चाफ्याचं बुटकसं झाड होतं, त्याला अगदी एखादा जरी  चाफा लागला ...